अल्पवयीन युवतीचे अपहरण करणाऱ्या तरुणास अटक

राहुरी :- अल्पवयीन युवतीचे अपहरण करणाऱ्याला पोलिसांनी बुधवारी रात्री आडगाव (नाशिक) येथे ताब्यात घेतले.

महाविद्यालयात जात असताना १७ रोजी या युवतीचे अपहरण करण्यात आले होते. पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय जाधव हे तपास करत होते.

निरीक्षक गाडे यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तपासाची चक्रे फिरवण्यात आली. सहायक फौजदार जाधव,

काॅन्स्टेबल महेंद्र गुंजाळ यांनी बुधवारी रात्री नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे आरोपी राहुल भामरे (नाशिक) याच्या मुसक्या आवळल्या.

मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे नातेवाईकांकडे रहात होता. याच दरम्यान त्याने युवतीचे अपहरण केल्याची चर्चा आहे.