जामखेड : महाजनादेश यात्रेत सोमवारी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत जामखेडकरांना दिलासा दिला. ते म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबध्द आहे.
समुद्रात वाहून जाणारे सुमारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून, या योजनेच्या माध्यमातून नाशिक, नगर व मराठवाड्यास मोठा फायदा होणार आहे.

जलसंधारणमंत्री म्हणून पंकजा मुंडे व राम शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून चांगले काम केल्याचे फडणवीस म्हणाले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, काँग्रेसने ध्रुवीकरणाचे, तर राष्ट्रवादीने जातीचे राजकारण केले.
गेल्या ७० वर्षांत जी कामे प्रलंबित होती, ती करताना समाजातील सर्व घटकांना भाजपने बरोबर घेतले. मराठा आरक्षणाचा प्रश्र मार्गी लावतानाच धनगर समाजाला आदिवासींच्या योजना लागू करून न्याय देण्याची भूमिका घेतली. पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात केलेल्या कामांचा आढावा घेतला.
कुकडी प्रकल्पाचे पाणी जामखेड तालुक्याला देण्याची मागणी त्यांनी केली. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा धरणात कुकडीचे पाणी नियमित सोडण्यात यावे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुढच्या सरकारमधील पहिला मंत्री मी आताच निवडला आहे. राम शिंदे यांना पुन्हा एकदा मंत्री करणार आहे. जेवढी जास्त मतं मिळतील, तेवढंच मोठं खातं त्यांना मिळेल.
- PNB च्या ग्राहकांसाठी मोठी संधी ! 400 दिवसांच्या एफडीवर मिळणार 7.75% व्याज, 4 लाखाच्या गुंतवणुकीत किती रिटर्न ?
- Samsung Galaxy M16 5G आणि M06 5G लाँच होताच स्वस्तात विक्रीला Amazon वर बंपर डील्स
- Volvo XC90 नव्या रूपात येणार ! 25 KMPL मायलेज देणारी 7 सीटर SUV
- Nothing चा नवा गेमचेंजर ! CMF फोन 2 मध्ये तगडा प्रोसेसर आणि 50MP कॅमेरासह लॉन्च होणार
- 200MP कॅमेरा आणि 12GB RAM असलेला Redmi Note 13 Pro आता 20 हजारांत