राम शिंदेंची डोकेदुखी वाढली, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत विधानसभा लढणार ?

Ahmednagarlive24
Published:

जामखेड: विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पळवापळवी सुरु असताना तिकीट न मिळाल्याने बंडखोरीलाही उधाण येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राम शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आधीच शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांचं संभाव्य आव्हान समोर राम शिंदें समोर आहे. त्यातच भाजपच्या गोटातील माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

नामदेव राऊत यांची बंडखोरी जवळपास निश्चित मानली जात आहे त्याचा पार्श्वभूमीवर महासंग्राम युवा मंचाच्या वतीने त्यांनी 9 तारखेला संकल्प मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यात राऊत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. 

शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी देखील विधानसभा निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे यांना पराभूत करुन विजय मिळवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. राम शिंदे यांची आपला मतदारसंघ टिकवताना चांगलीच दमछाक होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment