नगर – नगर शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी मारहाण करुन शिवीगाळ करत प्रेमसंबंध निर्माण करुन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आरोपीने अल्पवयीन मुलीवर संशय घेवून पोलो कारमध्ये बसवून दिल्ली गेट भागात कारमध्ये वेळोवेळी बलात्कार करून मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. शुभम ज्ञानदेव सुडके, रा. नालेगाव, नगर असे आरोपीचे नाव आहे.
पिडीत अल्पवयीन विद्यार्थिनीने या प्रकरणी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी शुभम ज्ञानदेव सुडके याच्याविरुद्ध भादवि कलम ३७६, ३६ ३, ३४१, ३२३, ५०४, ५०६ पोस्को कायदा कलम ३, ४ प्रमाणे गुरनं. ८३१ दाखल करण्यात आला आहे.
डिवायएसपी मिटके यांनी घटनास्थळी भेट दिली. व पो. नि. वाघ हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने पालक वर्गात व नगर शहरात खळबळ उडाली आहे.