अल्पवयीन मुलीला पळवून नेवून बलात्कार

Ahmednagarlive24
Published:

नगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील पारनेर तालुक्यातील धोत्रे परिसरातून एका १७ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले.

तिला नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता शिवारातील के कताई डोंगरामध्ये नेवून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीर संबंध करून बलात्कार केला. 

३१ मे ते २ जून २०१९ या काळात हा अत्याचाराचा प्रकार घडला, पिडीत मुलीच्या आईने काल एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन

आरोपी मुकेश बापू लहारे याच्याविरुद्ध भादवि कलम ३७६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) अधिनियम २०१२ चे कायदा कलम ३, ४ अनुसूचित जाती जमाती अधिनियम ३ १) (११) ३ (१) डब्ल्यूप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक पोलीस अधिक्षक कलवानिया यांनी घटनास्थळी भेट दिली. स्वतः कलवानिया हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment