अहमदनगर ब्रेकिंग : महिलेसह तिच्या मुलीवर अत्याचार,आरोपी रिक्षा चालकास अटक एक फरार…

Published on -

अहमदनगर – नगर शहरमध्ये एका शासकीय नोकरदार विधवा महिलेवर रिक्षा चालकाने तर त्या महिलेच्या मुलीवर रिक्षा चालकाच्या मित्राने अत्याचार केला असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षा चालकाला पकडून न्यायालयात उभे केले असता पोलीस कोठडी मिळाली असून त्याचा मित्र फरार झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती माहिती अशी, नगरमध्ये शासकीय सेवेत असणाच्या पीडित महिलेच्या पतीचे २०१० मध्ये निधन झाले होते.

त्यांचा लहान मुलगा व १५ वर्षाच्या मुलीस शाळेत ने – आण करण्यासाठी रिक्षा लावण्यात आली.

या रिक्षावरील चालकाने पीडितेशी सलगी वाढवली आणि पाच वर्षांपासून धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला.

तर दुसरीकडे त्याच्या मित्राने पीडित महिलेच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

त्यानंतर घटनेतील मुख्य आरोपी रिक्षा चालक पोलीस कोठडीत असून दरम्यान गुन्हा दाखल होताच आरोपीचा मित्र फरार झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe