अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात बँकांचे सर्वाधिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीनं होत आहेत. व्यावसायिक आणि बँकांच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ट्विट करुन ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी वापरली जाणारी एनईएफटी सेवा २३ मे रोजी १४ तासांसाठी बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.
एनईएफटी सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी रात्री १२ ते २३ मे रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ही सेवा बंद असणार आहे. त्यामुळे या वेळेत पैशांचा व्यवहार करता येणार नाही. जवळपास १४ तास ही सेवा बंद असणार आहे.
अपग्रेड दरम्यान बँक खातेधारकांना त्याचे अपडेट मिळतील असंही आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. १८ एप्रिल २०२१ रोजीही असंच अपग्रेडशन करण्यात आलं होतं.
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर(NEFT) म्हणजे काय? :- एनईएफटीच्या माध्यमातून दोन लाखांपर्यंतचा व्यवहार केला जाऊ शकतो.
या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँके खात्यात थेट पैसे पाठवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. मात्र यासाठी दोन्ही बँक खातेधारकांकडे इंटरनेट बँकिंग सेवा उपलब्ध असणं गरजेचं आहे.
डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ६ जून २०१९ रोजी आरबीआयने NEFT सेवा निशुल्क केली आहे. ही सुविधा पूर्वी सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत होती. मात्र आता ही सुविधा २४ तास उपलब्ध असते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम