अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात मागील चार दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. गुरुवारीही आणखी सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, भिंगारजवळील आलमगीर येथील कोरोनाबाधिताला १४ दिवसांच्या उपचारांनंतर गुरुवारी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण २५ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ४३ रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी १४ जणांवर सध्या उपचार सुरू असून, २५ जणांना १४ दिवसांच्या उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. दोघांचा मृत्यू झाला आहे.
नगर शहर व तालुक्यात आढळून आलेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. सोमवारी, मंगळवारी, बुधवारी व गुरुवारी जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
जिल्ह्यात सर्वाधिक रूग्ण जामखेडमध्ये आढळून आले आहेत. तेथे १७ जणांना बाधा झाली आहे. जामखेड व संगमनेर हे दोन हॉटस्पॉट म्हणून जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहेत.
बुधवारी पाठवलेल्या १८ नमुन्यांपैकी ११ नमुने निगेटिव्ह आले होते. उर्वरित सात जणांचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले असून, ते सर्व निगेटिव्ह आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®