जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांचा गौप्यस्फोट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आ. मधुकरराव पिचड यांनी सीताराम पाटील गायकर यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड केली.

गायकर यांच्या सारख्या अकोले तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळत आहे हे पाहून मी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यावेळी माघार घेतली, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी केला.

तसेच गायकर यांनी आपल्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत उत्कृष्ट कार्य केले असेही कर्डीले म्हणाले. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकर्‍यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल अगस्ति कारखाना,

अमृतसागर दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, अकोले नगरपंचायत यांच्यावतीने जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, ज्येष्ठ संचालक माजी आमदार शिवाजीराव कर्डिले,

उपाध्यक्ष रामदास वाघ, ज्येष्ठ संचालक बाजीराव पाटील खेमनर, संचालक व माजी आमदार वैैैभवराव पिचड, कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांचा अगस्ति कारखाना सभागृहात सत्कार आयोजित केला होता.

यावेळी कर्डिले बोलत होते. शेतकर्‍याला मदत झाली पाहीजे हाच खरा उद्देश आहे. थकीत कर्जदाराला एक रकमी परतफेडचा निर्णय घ्यावा.

बँकेत कधी राजकारण किंवा पक्षपार्टी आड आली नाही. जिल्ह्यातील एकही कारखाना राज्य सहकारी बँकेचे कर्ज घेत नाही. सर्व कारखाने आता जिल्हा बँकेकडे आहेत असेही कर्डिले म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment