अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- वाडियापार्क क्रीडा संकुलाच्या पार्किंगच्या जागेवर उभारलेली ‘बी’ इमारत महापालिकेने जमीनदोस्त केली आहे. याठिकाणी व्यवसाय करणारे व्यावसायीक हे बेरोजगार होणार नाही याची काळजी घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्याशी केली आहे.
येथील वाडियापार्कमधील बी बिल्डींग पाडण्याची कारवाई महापालिकेने केली. सदर इमारतीतील व्यावसायीकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केली आहे.
अनधिकृत इमारत पाडून अधिकृत व्यवसायीकांसाठी उभारलेली इमारतीचा काही भाग न पाडता तो मनपाकडे वर्ग करुन घ्यावा अशी मागणी कदम यांनी केली आहे. सर्वसामान्यांना गाळे कसे राहतील याची महापौरांनी काळजी घ्यावी असे ते म्हणाले.
तसेच याठिकाणी असलेल्या गाळेधारकांना पोटापाण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी कदम यांनी केली आहे.