अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाचा सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (१४ डिसेंबर) काय निर्णय होतो व या सुनावणीच्यावेळी तो हजर राहतो की नाही, याबाबत उत्सुकता व्यक्त होत आहे.
दरम्यान, हत्याकांडात अटक करण्यात आलेले आरोपी फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे यांची न्यायालयीन कोठडीतून पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
त्याची मुदत संपल्याने त्यांना रविवारी पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रेखा जरे यांची 30 नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाच आरोपी अटकेत आहेत. हत्याकांड प्रकरणी नाव आल्यानंतर पसार झालेला बाळ बोठे अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही.
त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.
दरम्यान अटकपूर्व सुनावणीच्या वेळेस बोठे याला न्यायालयात हजर राहण्यास सांगा, अशा आशयाचा अर्ज पोलिसांनी न्यायालयासमोर ठेवला आहे. त्या अर्जावर न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये