अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- आरक्षणासाठी मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी शुक्रवारी घोषणाबाजी देत ठिय्या आंदोलन केले.
विशेष म्हणजे थोरातांची बहीण नगराध्यक्ष दुर्गा तांबे व त्यांचे पती आमदार डॉ. सुधीर तांबेही या आंदोलनात होते. मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक बैठकीत ठराव होऊन
आरक्षण मिळण्यासाठी गांधी जयंतीचे औचित्य साधून महाविकास आघाडीचे खासदार, आमदार व नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची हाक देण्यात आली होती.
मंत्री थोरातांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीत खुर्च्या खाली करा’,
अशा घोषणा देण्यात आल्या. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, इंद्रजित थोरात, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, नवनाथ अरगडे, अमोल खताळ, खंडू सातपुते, अमोल कवडे, किरण घोटेकर,
अशोक सातपुते, राजेंद्र देशमुख, नारायण खुळे, अविनाश थोरात, शरद थोरात, दिनेश फटांगरे आदी उपस्थित होते. त्रुटी दूर करून मराठा समाजाला
आरक्षण देण्यासाठी मंत्री थोरातांनी पाठपुरावा करावा. आरक्षण हीच बहिणीला भाऊबीजेची ओवाळणी ठरेल, अशा भावना नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी यावेळी व्यक्त केली
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved