अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील करोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने ११ हजारचा आकडा पार केला आहे, यामुळे जिल्ह्यात आरोग्याची स्थिती गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत उद्या (दि.14) शुक्रवारी जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यासह अधिकार्यांची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/05/ahmednagar-map-news-2.jpg)
कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी काय उपायोजना करता येतील यावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीला जिल्ह्यातील सर्व मंत्री, दोन खासदार, सर्व आमदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि मनपा आरोग्य विभागासह कायदा सुव्यवस्थेचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील दालनात दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील वाढत्या करोना संसर्गावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी चर्चा करणार आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved