अहमदनगर Live24 टीम,2 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील रहिवाशी कृष्णा विठ्ठल जाधव (वय 28 वर्षे) याने कौटुंबिक वादातुन चक्क घराजवळीलच इंग्लिश स्कुलच्या आवारातील ग्रामपंचायतीच्या 50 फुट उंचीच्या पाण्याच्या टाकीवर चढण्याचा पराक्रम केला.
वर कोणी येवु नये म्हणुन शेवटच्या टप्यातील लोखंडी शिडी काढुन टाकली. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

या माथेफिरू विरुला खाली येण्यासाठी आव्हान केले. माञ तो तरुणाने खाली उतरण्यास साफ मनाई केली. शेवटी हतबल झलेल्या पोलिसांनी श्रीरामपुर नगर पालिकेची आग्नीशामक व रुग्णवाहीका पाचारण केली.
अखेर आग्निशामक दलाने त्याच्यावर पाण्याचा फवारा मारायचा व शेवटच्या टप्यात उभ्या केलेल्या चार पाच तरुणांनी त्याला चकवा देवुन वर चढायचे व ताब्यात घ्यायचे असे ठरले.
शेवटी या नाट्यमय घटनेनंतर त्या तरुणास ताब्यात घेण्यात आले. सदर कामगिरी सपोनि नितिन शिंदे पोलिस शिपाई योगेश राउत, सोमनाथ आरगडे, सागर पठारे, विकी मघाडे, संभाजी धोञे, मेजर चांद शेख यांनी जीवाची बाजी लावुन या माथेफिरुला टाकीवरच जेरबंद केला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved