नेवासा :- लोकसभेच्या मागील निवडणुकीनंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी नेवासे तालुक्याकडे विशेष लक्ष दिले नाही.
तालुक्यात त्यांचे संपर्क कार्यालय शेवटपर्यंत झाले नाही. त्यामुळे नागरिक त्यांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.
ही नाराजी लोखंडे यांनी अजून दूर केलेली नाही. लोखंडे चार-साडेचार वर्षे तालुक्यात फारसे दिसले नाहीत.
खासदार निधीतून तालुक्यात विशेष भरीव कामे केली नसल्याने नाराजी आहे.
पांढरीपूल एमआयडीसी वाढवण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न झाले असते, तर भूमिपुत्रांना काम मिळाले असते.
विस्तारीकरण तर नाहीच, पण आहे त्यामध्ये स्थानिकांना रोजगाराचे नियोजन केले नाही. धरणाच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.
नवखे असतानाही मागील वेळी त्यांना तालुक्याने भरपूर मते दिली, परंतु मतदारांची झोळी रिकामीच राहिल्याने त्यांच्याबद्दलची नाराजी अजून दूर झालेली नाही.