संगमनेर : आचारसंहितेचे उल्लंघन करत विनापरवानगी सभा घेतल्याच्या कारणावरून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने युतीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली.
अकोले विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या संगमनेर तालुक्यातील अकलापूर येथील दत्त मंदिरामध्ये गुरुवारी सकाळी सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी तेथे सभा घेण्यात आली. या सभेत लोखंडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर टीका केली.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अप्पा केसेकर, तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांच्यासोबत शिवसेनेचे संगमनेर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी या सभेसंबंधीचे मॅसेज व्हॉटस् app वरून कार्यकर्त्यांना देण्यात आले होते.
याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यत पोहोचली. त्यांनी या सभेचे चित्रिकरण करण्याचे आदेश आपल्या पथकाला दिले होते. सभेची कोणतीच परवानगी त्यांच्याकडून घेतली गेली नव्हती.
तसेच पोलिसांकडून अशी कोणतीही परवानगी नसल्याची माहिती मिळताच लोखंडे यांच्याविरोधात भंगाचा गुन्हा नोंदवण्याचा आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री उशिराने दिले.
- बँक ऑफ बडोदाची एफडी योजना ठरणार फायदेशीर, 12 महिने दोन लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार? पहा…
- 10 लाखांत मिळणाऱ्या टॉप 5 ADAS कार! होंडा, मारुती, महिंद्रा कोणता ब्रँड बेस्ट ?
- Best Cars Under 10 lakhs : ह्या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार्स ! किंमत फक्त दहा लाख
- Airtel ग्राहकांसाठी मोठी ऑफर ! 365 दिवस अमर्यादित कॉलिंग आणि 30GB डेटा…
- 99Wh बॅटरी, AI असिस्टंट आणि तगडा प्रोसेसर! Xiaomi च्या पहिल्या AI PC बद्दल जाणून घ्या