पुरोगामी चळवळीला नक्षलवादी ठरविण्याचा डाव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने ज्या घाई गडबडीने एनआयएकडे दिला. त्यावरून हा निर्णय काळजी वाढवणारा आहे.

पुरोगामी, दलित, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरविण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे यातून स्पष्ट दिसत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

मंगळवारी ना. थोरात हे संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले, हे व्यासपीठ पुरोगामी विचारांचे होते. तिथे कवी, साहित्यिक, विचारवंत यांनी आपले विचार मांडले. सत्ताधारी पक्षाच्या विचारधारे विरोधात विचार मांडले म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे चुकीचे आहे.

हा पुरोगामी, आंबेडकरवादी विचार दाबण्याचा प्रयत्न आहे. कोणी काही वेगळे वागले असेल, कोणाविरोधात काही पुरावे असतील, तर आम्ही त्यांचे समर्थन करत नाही. परंतु, एकूणच या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने एनआयएकडे देण्यात आला. त्याचा वेळ, काळ पाहिला तर सर्वच संशयास्पद वाटते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment