महिलेच्या अंगावरील कपडे फाडत जिवे ठार मारण्याची धमकी

Published on -

संगमनेर  – संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथे राहणा-या ३४ वर्ष वयाच्या महिलेने माझ्या सासूला शिवीगाळ का केली? असा जाब विचारल्याने दोघा आरोपींनी तुम्ही सामाईक रस्ता वापरायचा नाही, असे म्हणत महिलेची गचांडी धरुन धक्का बक्की करुन अंगावरील कपडे फाडून लजा उत्पन्न होईल, असे वर्तन करुन विनयभंग केला.

शिवीगाळ करत जिवे ठार मारुन टाकू, अशी धमकी दिली. पिडीत महिलेने वरीलप्रमाणे घारगाव पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी भागवत भाऊसाहेब डोमाळे, भाऊसाहेब भागा डोमाळे, दोघे रा. विरेवाडी, ता. संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये कोंबड्या व रस्त्याच्या कारणातून वाद आहेत हेकाधं टकले हे पुढील तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe