घरात झोपलेल्या तरुणीचा विनयभंग करुन पतीस मारहाण

Published on -

संगमनेर :- तालुक्यातील पाचखिळवाडी कौठे मलकापूर परिसरात राहणारी एक २४ वर्षाची विवाहित तरुणी तिच्या घरात झोपलेली असताना याच भागात राहणारा आरोपी अनिल गावडे रा. पाचखळवाडी हा दरवाजा लोटून घरात घुसला.

त्याने तरुणीचा हात धरला तेव्हा घाबरुन तरुणी उठली. अनिल गावडे याने तरुणीला धरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले व विनयभंग केला.

पिडीत तरुणीने चुलत सास-याला हा प्रकार सांगितला. तसेच पतीलाही हा प्रकार सांगितला. तेव्हा पती यासंबंधी आरोपी अनिल गावडे याला जाब विचारला असता त्याने टणक वस्तूने मारुन त्यांना जखमी केले.

वरीलप्रमाणे पिडीत तरुणीने घारगाव पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी अनिल गावडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe