संगमनेर – जमीन विकल्याच्या कारणातून भाऊबंद नातेवाईकांनी संदीप रमेश ठोंबरे , वय ३५, रा. पिंपरणे, ता. संगमनेर याला बेदम मारहाण करुन त्याचा खून केला. ही खळबळजनक घटना काल पिंपरणे गावच्या शिवारात घराजवळील रस्त्यावर घडली.
या प्रकरणी मयत संदीप रमेश ठोंबरे यांच्या पत्नी दीपाली संदीप ठोंबरे वय २५ रा. पिंपरणे शिवार यांनी काल संगमनेर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी भाऊसाहेब लक्ष्मण ठोंबरे, लक्ष्मीबाई भाऊसाहेब ठोंबरे, रा. पिंपरणे, ता संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दीपाली संदीप ठोंबरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी भाऊसाहेब ठोंबरे हा चुलत सासरा आहे. त्याच्याशी शेतजमिनीवरुन वाद आहे. माझ्या सास-याने त्यांच्या हिश्याच्या शेतजमिनीमधील २० गुंठे शेतजमीन विकल्याचा आरोपींना राग होता.
विकलेल्या २० गुंठे शेतजमिन घेतलेल्यांना हरकत अडथळा करून तुम्ही येथे यायचे नाही. तुम्ही येथे आले तर तुमचे तंगडे तोडू, अशी धमकी दिली.
यावरुन आरोपींनी आम्हाला तुम्ही विकलेल्या शेतजमिनीत माझी जमीन आहे, असे म्हणत तुम्हाला एकेकाला संपवून टाकील, अशी धमकी देवून पती संदीप रमेश ठोंबरे यांना लाथाबुक्क्याने व काहीतरी वस्तूने बेदम मारहाण करुन जबर जखमी केले. त्यांना प्रथम तांबे हॉस्पिटल व नंतर लोणीच्या प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र ते मयत झाले.
- वयाच्या 35 शी नंतर आई होण्याचा निर्णय घेताय?, मग ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष नकोच! डॉक्टर सुद्धा करतात हीच शिफारस
- चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिलासा! ‘या’ खेळाडूच्या कमबॅकची शक्यता, आता कशी असेल प्लेइंग XI?
- जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करा खासदार नीलेश लंके यांची संसदेत ठाम मागणी
- सकाळी की संध्याकाळी? 90% लोक चुकीच्या वेळी चालतात! जाणून घ्या चालण्यासाठीची सर्वोत्तम वेळ
- दुधही असते मांसाहारी! काय आहे हा प्रकार आणि कशापासून बनते हे मांसाहारी दूध?, जाणून घ्या