संगमनेर ; बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

Published on -

संगमनेर | तालुक्यातील पेमगिरी येथे यात्रेनिमित्त आलेली महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना बुधवारी (८ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास पेमगिरी-नांदुरी शिवालगत घडली.

सुदेशना रावसाहेब खैरनार (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे. पेमगिरी येथील यात्रोत्सवाला सुदेशना खैरनार या मुलगा सूरजबरोबर दुचाकीवर येत होत्या.

पेमगिरी व नांदुरी शिवालगत डाळिंबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला.

सुदेशना यांच्या डाव्या पायावर बिबट्याने जोराचा पंजा मारल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने धांदरफळ खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले.

डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडले. मात्र, या घटनेने गावा व परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिकांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe