‘संकटात लढणे’ ही संगमनेरकरांची परंपरा

Published on -

अहमदनगर – ‘संकटात लढणे’ ही संगमनेरकरांची परंपरा आहे. मतभेद निर्माण करून काहीजण विष कालवण्याचा प्रयत्न काही करीत आहेत. आपल्याला सहकार, समाजकारण, राजकारण, संस्कृती टिकवायची असेल, तर आपआपसातील मतभेद विसरून एकत्रीतपणे आपली ताकद दाखवावी लागेल,’ असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुका दूध संघाच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख होते.

या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, इंद्रजितभाऊ थोरात, शंकर खेमनर, अजय फटांगरे, सुरेश थोरात, आर. एम. कातोरे, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे आदी उपस्थित होते. या प्रसंगी उत्कृष्ट दूध वितरण व दूध उत्पादक संस्थांचा गौरव करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe