संगमनेर :- बसस्थानकावर प्रवासी महिलेशी वाद घालताना हटकले म्हणून पोलिसालाच धक्काबुक्की करणाऱ्या मुजाहिद हबीबसाहब शेख (२६ वर्षे, राजापूर)
बसस्थानकावर प्रवासी महिलेशी वाद घालताना हटकले म्हणून पोलिसालाच धक्काबुक्की करणाऱ्या मुजाहिद हबीबसाहब शेख (२६ वर्षे, राजापूर)

या तरुणाला न्यायालयाने दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. वर्षभराच्या आतच न्यायालयाने या खटल्याचा निकाल दिला.
१९ जुलै २०१८ रोजी दुपारी बारा वाजता संगमनेर बसस्थानकावर शेख याचे एका महिलेशी वाद सुरु होते.
ही माहिती मिळताच तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने शेख याला विचारणा केली असता त्याने पोलिसालाच धक्काबुक्की करत अरेरावी केली.
त्याने पोलिसालाच धक्काबुक्की करत अरेरावी केली.
त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरुन शेख याच्याविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी तपास करत आरोपीविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
न्यायाधीश प्रेमकुमार विठलाणी यांच्यासमाेर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने अकरा साक्षीदार तपासण्यात आले.
सरकारी वकिलांनी आरोपीविरोधात भक्कम पुरावे न्यायालयासमोर आणले.
न्यायाधीश विठलाणी यांनी पुरावे ग्राह्य धरत आरोपी शेख याला दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. शिवाय एक हजार रुपये दंड केला.
दंड न भरल्यास आणखी पंधरा दिवसांचा कारावास भोगायचा आहे. सहायक फौजदार एस. एम. इनामदार आणि सिकंदर शेख यांनी सरकार पक्षाला मदत केली.
- साईदरबारी महिलेने केलेल्या संकल्पाची पूर्ती! खास इंग्लडहून येत साईचरणी अपर्ण केला तब्बल ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट
- Toyota Vellfire ने केला मोठा रेकॉर्ड, अशी बनली लक्झरी कार बाजाराची राणी!
- Ahilyanagar News : अहिल्यानगरसह अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या ‘या’ मंदिराची वक्फ बोर्डाकडे नोंद
- BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत 160 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?