नगर : शहरातील विद्युत पोलवरील तारा जमिनीअंतर्गत टाकून घेण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. महापौर झालो तेव्हा सीना नदीच्या सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपयांचा निधी आणला. या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली होती.
परंतु काही विघ्नसंतोषी राजकारण्यांनी अधिकाऱ्यांना दमबाजी करून हे काम बंद पाडले. नंतर याच लोकांनी आमदार झाल्यावर सीना नदीच्या याच सुशोभीकरणाच्या कामासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवला, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून गुलमोहोर रोडवरील आनंद विद्यालय परिसरातील बंद पाइप गटार काम व रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
या वेळी नगरसेविका शोभा बोरकर, अशोक सोनवणे, ज्योती गाडे, नगरसेवक संपत बारस्कर, अजिंक्य बोरकर, बाळासाहेब बारस्कर, विनित पाऊलबुधे, अमोल गाडे, सदानंद कुलकर्णी, दौलत शिंदे, श्याम जोशी, उपस्थित होते.
- महाराष्ट्रात खरंच 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार का? सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या बातमीमागील सत्य नेमके काय? वाचा…
- आली आयपीओतून पैसे कमावण्याची संधी! खरेदीसाठी खुला होत आहे ‘हा’ आयपीओ; संधीचे करा सोने
- पंजाबरावांचा शेतकऱ्यांसाठी तातडीचा मॅसेज ! महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल; 15, 16 आणि 17 जानेवारीला राज्यात……
- भारतात एक व्यक्ती जास्तीत जास्त किती जमीन खरेदी करू शकतो? महाराष्ट्रात काय आहेत नियम?
- टॅक्स ही वाचवा आणि पैसा तिप्पटीने वाढवा! म्युच्युअल फंडाची ‘ही’ योजना बनवेल श्रीमंत