अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात सुजय विखे यांनी बाजी मारली आहे.
आतापर्यत डॉ.विखे यांनी चौदाव्या फेरीअखेर तब्बल दोन लाखांहून जास्त मताधिक्य मिळाले आहे. त्याच बरोबर आमदार जगताप यांचे होमग्राउंडव असलेल्या नगर शहरातच भाजपच्या डॉ.सुजय विखे यांना लीड मिळाले आहे.

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ४० हजार मतांचे लीड मिळाल्याचे वृत्त आहे.अहमदनगर शहरातून २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांनी विजय मिळविला होता.
तत्पुर्वी त्यांनी दोनदा शहराचे महापौरपद भुषविले होते. तसेच त्यांचे वडील विधानपरिषदेचे सदस्य आहेत. तर पत्नी शितल जगताप यांही नगरसेविका आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक आहेत.
नगर शहरातूनच जनतेनी नाकारल्याने आगामी काळात विधानसभा निवडणुकी ही आ.संग्राम जगताप यांना धोक्याची ठरणार आहे.
- खूप प्रॅक्टिकल असतात ‘या’ जन्मतारखेच्या मुली, भावनांमध्ये न अडकता व्यावहारिकपणे घेतात कोणताही ठोस निर्णय!
- 1 जुलै पासून पुढील 6 महिने ‘या’ राशीच्या लोकांसाठी ठरणार गेमचेंजर ! बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी
- रेल्वेने दिला झटका! आजपासून AC ते स्लीपर क्लासचा प्रवास होणार महाग, जाणून घ्या नवीन दर
- मुकेश अंबानींच्या 27 मजली घराचं नाव ‘अँटिलिया’च का?, या नावामागेही दडलाय मोठा गूढ अर्थ!
- बापरे! तब्बल ₹2,00,00,00,000 नेट वर्थ आणि एकच बॉलीवूड ब्लॉकबस्टर सिनेमा, आज दोन जुळ्या मुलांची आई असलेली ही अभिनेत्री कोण?