अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :- यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात अहमदनगर शहराचा समावेश झाला होता. यामध्ये नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये करणे.
याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता.
केंद्र सरकारने मागील वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात बदल केले होते. तीन टप्प्यात सर्वेक्षण केले जाते. स्वच्छ सर्वेक्षणात अहमदनगर महापालिकेने देशात चाळीसावा क्रमांक पटकावला आहे.
अहमदनगर महापालिकेला केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत 6000 गुणांपैकी चार हजार 153 गुण मिळाले असून अहमदनगर शहर देशात 40 वे आले आहे.
अहमदनगर महापालिकेने नगर शहरात विविध ठिकाणी राबवलेल्या स्वच्छता अभियाना अंतर्गत केलेल्या उपाययोजनांचा उपाययोजनांसाठी हे गुण मिळाले आहेत.
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत महापालिकेने सादर केलेल्या माहितीनुसार केंद्रीय पथकाने नगर शहरातील घरोघरी जाऊन संकलित केला जाणारा कचरा, शौचालय, गटारी, खत प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प आदी कामे केली आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved