अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने श्रीगोंदा येथे पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात उपहासात्मक आंदोलन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतदादा तांबे यांच्या मार्गदर्शनात आज अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे यांच्या नेतृत्वात पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना गुलाब पुष्प देऊन हेच का अच्छे..?

दीन म्हणून उपहासात्मक आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना वाबळे म्हणाले देशात काँग्रेसचे सरकार असताना प्रति बॅलर १००ते १२० डॉलर भाव असताना सुद्धा पेट्रोल चे दर ७०ते७२ रू प्रती लिटर होते सध्याचे भाव प्रती बॅलर ५०ते६० डॉलर असतानाही पेट्रोलचे दर प्रति लिटर ९० ते १०० झाले आहेत.

कोरोना काळात अनेक होतकरू तरुणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत अनेक कुटुंब आर्थिक उध्वस्त होत असतानाही मोदी सरकारला सर्वसामान्य लोकांची कोणतीही दया मया न येता उलट अच्छेदिन च्या नावाखाली दिवसा ढवळ्या लोकांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारून आपले व आपल्या सहकारी मंत्र्यांचे शौक पुरवताना दिसत आहेत.

भविष्यात जर अशीच परस्थिती राहिली तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून आणखी तीव्र आंदोलने करण्यात येतील. यावेळी नगरसेवक समिर बोरा, गणेश भोस,Adv अनिकेत भोसले युवक काँग्रेस शहराध्यक्ष योगेश मेहेत्रे, एन एस यू आय तालुका अध्यक्ष आदिल शेख, शहराध्यक्ष धीरज खेतमाळीस,

अपलसंख्याक शहराध्यक्ष जैद अत्तार, जिल्हा सरचिटणीस आदेश शेंडगे, तालुका कार्याध्यक्ष अक्षय नितनावरे, शिवसेनेचे शिवराज ताडे, इंद्रजीत शिंदे, सागर वाघमोडे, भूषण शेळके, किरण चव्हाण, रोहन खेडकर, तेजस गलांडे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe