आनंदाची बातमी : एसबीआयचे कर्ज पुन्हा स्वस्त…

Ahmednagarlive24
Published:

दिल्ली :- देशातील स‌‌र्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) पुन्हा एकदा कर्जावरील व्याजदरात कपात केली आहे.

बँकेने सर्व प्रकारच्या कर्जावरील मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस बेस्ट लेंडिंग रेट अर्थात एमसीएलआरमध्ये १० मूळ अंकांची (०.१० %) कपात केली आहे.

बँकेने सलग पाचव्यांदा कर्जावरील व्याजदर घटवले आहेत. या कपातीमुळे बँकांच्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज मिळणार आहे. नवे व्याजदर १० सप्टेंबरपासून लागू होतील, असे एसबीआयने म्हटले आहे.

गृह, वाहनसह सर्व प्रकारच्या व मुदतीच्या कर्जासाठी ही कपात लागू होईल, असे बँकेने म्हटले असून आता व्याजदर घटून ८.१५% झाले आहेत. चालू आर्थिक वर्षात (२०१९-२०) एसबीआयने सलग पाचव्यांदा व्याजदर घटवले आहेत.

याशिवाय बँकेने व्याजदरातील सातत्याची घट आणि रोकडची चणचण लक्षात घेऊन किरकोळ ठेवींवरील व्याजदर ०.२५ टक्क्यांपर्यंत घटवले आहेत. तर घाऊक (बल्क) ठेवीवरील व्याजदर ०.२० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment