अहमदनगर शहरातील ‘हा’ भाग सील

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- शहरातील सुभेदार गल्ली व सारसनगर भागात सात रुग्ण सापडताच नगर शहरातील माळीवाड्यासह मोठा भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

त्यामुळे या परिसरात नागरिकांना फिरण्यास, तसेच दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने शहरातील खाद्यपदार्थांची, तसेच अन्य एकल दुकाने उघडण्याची मुभा दिली होती. त्यानंतर शहरातील सुभेदार गल्लीत पाच, तसेच सारसनगर परिसरातील शांतीनगरमध्ये दोन, असे सात कोरोनाबाधित आढळून आले.

त्यामुळे आज दुपारी या परिसरापासून दोन किलोमीटर हवाई अंतर असलेला परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

तो 27 मेपर्यंत बफर झोन राहणार आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून हा परिसर “सील’ करण्याची कारवाई आज सुरू करण्यात आली.

दुकाने व आस्थापना तातडीने बंद करण्याच्या सूचना मिळत होत्या. त्यामुळे घबराट आणखी वाढली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी, प्रशासनाने सांगितलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

या आदेशामुळे शहरातील माळीवाडा, वाडिया पार्क, पंचपीर चावडी, जुना बाजार, वसंत टॉकीज चौक, माणिक चौक, आशा टॉकीज चौक, नवी पेठ, कापड बाजार, अर्बन बॅंक रस्ता, गांधी मैदान, चितळे रस्त्याचा अर्धा भाग आदी ठिकाणे “सील’ करण्यात आली आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment