अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री तथा भाजपा नेते राम शिंदे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाल्याची चर्चा आहे.
मात्र अशी भेट झाली नाहीच असे राम शिंदे यांनी सांगितले. राज्यातील प्रत्यक्ष आणि गुप्त भेटींचे लाेण आता नगर जिल्ह्यातही पोहोचला आहे.
कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. पण साखर कारखान्यावरच चर्चा करायची असेल तर भेटीबाबत गुप्तता का? असा सवालही चर्चिला जातोय.
दोन्ही नेत्यांनी भेटीबाबत कुठेही वाच्यता केलेली नाही. त्यांच्या निकटवर्तीयांनाही याबाबत फार माहिती नसल्याचं दिसतं आहे. विशेष म्हणजे राम शिंदे यांनी अशी कुठलीही भेट झाल्याचं नाकारलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अजित पवार आणि राम शिंदे यांच्यात साधारण अर्धा तास चर्चा झाली.
ही भेट नक्की कशासाठी होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम