फडणवीस व इंदुरीकर महाराजांमध्ये पुन्हा व्यासपीठांवर गुप्त बातचीत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- आपल्या कीर्तनाने सर्वाना मंत्रमुग्ध करणारे कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणाने चर्चेत असतात.

नुकतीच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा एका व्यासपीठावर एकत्र दिसले होते. दरम्यान या व्यासपीठावर या दोघांमध्ये काही चर्चा झाली व व या चर्चेने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तर्क वितर्क ला उधाण आले आहे.

यावेळी फडणवीसांसोबत व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली होती. ही यात्रा संगमनेर येथे आल्यानंतर फडणवीस यांच्या व्यासपीठावर इंदुरीकर महाराज दिसले होते.

त्यानंतर इंदुरीकर महाराज हे भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र, या चर्चाना महाराजांनी फुल स्टॉप लावत आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं जाहीर केलं होत.

त्यातच आज पुन्हा एकदा इंदुरीकर महाराजांनी थेट व्यासपीठावर जात फडणवीस व पाटील यांची भेट घेतल्याने नव्याने चर्चांना तोंड फुटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment