अहमदनगर जिल्ह्यातील खळबळजनक घटना चक्क महिलांनीच विवाहीत महिलेस विकले !

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर तालुक्­यातील दत्तनगर येथील दोघींनी मालेगाव येथील एका विाहित महिलेस केटरींगच्या कामासाठी बोलावून त्या विवाहीत महिलेला चक्क इंदौर येथे १ लाख २० हजार रूपयांना विकल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव ‘मोतीनगर भागात राहणाऱ्या एका तरूणाने श्रीरामपूर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अनिता रविंद्र कदम( रा.आंबेडकर वसाहत, दत्तनगर, श्रीरामपूर)

व अनिता कदम हिची मैत्रिण संगिता( पूर्ण नाव माहित नाही). या दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्य तरूणाने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, माझ्या पत्नीला केटरिंगच्या कामासाठी आमच्याकडे येवु द्या,

यासाठी तीला तिला फुस लावून आनले. त्यानंतर अनिता कदम व संगीता यांनी तिला मध्यप्रदेशातील इंदौर येथे नेवून अज्ञात व्यक्तीकडून १लाख २०हजार रुपये घेवून तिला त्या इसमाच्या ताब्यात दिले.या घटने मुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.