अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अनेकदा शेतकऱ्यांच्या शेतांमधून महावितरणच्या विजेच्या मोठं मोठ्या वीजतारा गेलेल्या असतात. यामुळे अनेकदा अपघात घडत असून याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्याला बसत असतो.
असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. उसाच्या क्षेत्रावरुन गेलेल्या वीजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाला. यामुळे अडीच एकर क्षेत्र जळाल्याने,
शेतकऱ्याचे सुमारे सात लाख रुपयांची नुकसान झाल्याची घटना प्रतापपूर शिवारात मंगळवारी ( ता. 06) दुपारी एकच्या सुमारास घडली.
प्रतापपूर येथील पांडूरंग भिकाजी आंधळे यांचे आश्वी बुद्रूक ते प्रतापपूर शिवेवर गट क्रमांक 508 मध्ये अडीच एकर उसाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात तोडणीला आलेला ऊस होता.
शेतातील विंधन विहीरीवरील विजपंपासाठी शेतावरुन विजवाहक तारा ओढण्यात आल्या आहेत. मंगळवारी दुपारी या तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे ठिणग्या पडून लागलेली आग चांगलीच भडकली.
आगीची बातमी समजताच पद्मश्री विखे पाटील कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या बंबाने घटनास्थळी धाव घेवून आग विझवली.
या दुर्घटनेत शेतकऱ्याचा अडीच एकर ऊस जाळून खाक झाला असून यामुळे शेतकऱ्याचे सुमारे सात लाख रुपयांची नुकसान झाले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved