शाहिद कपूर बनणार तिसऱ्यांदा बाप? मीराने केला खुलासा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- शाहिद कपूर जितका प्रसिद्ध आहे तितकीच त्याची बायको मीरा कपूर पण प्रसिद्ध आहे. मीराचा बॉलिवूडशी संपर्क नसला तरी सोशल मीडियातून ती सक्रिय असते. मीरा आणि शहीद यांनी २०१५ साली लग्न केले.

त्यानंतर त्यांना एका वर्षाच्या आतच मिशा नावाचा कन्येला जन्म दिला. शाहिद आणि मीरा यांना २०१८ साली एक पुत्रप्राप्ती पण झाली. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्ये आहेत.

अलीकडेच शाहिद आणि मीरा तिसऱ्यांदा आई बाबा बनणार असल्याचे कळतय.हि चर्चा अफवा आहे कि खर याची सत्यता पडताळण्यासाठी एका चाहत्याने डायरेक्ट मीराला प्रश्न विचारला होता.

त्यावर तिने त्याच स्पष्टीकरण दिले आहे. या प्रश्न उत्तराच्या खेळात मीराने अनेक गमतीदार प्रश्नांची उत्तर दिली आहेत. चाहत्याने मीराला प्रश्न विचारलं की, “तू तिसऱ्यांदा प्रेग्नेंट आहेस का?” यावर मीरने ‘नो’ असं उत्तर देऊन सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे.

सोबत तिने लाफिंगचं इमोजी पण टाकला आहे. ती पुढे म्हणते,मला माहित नाही या सगळ्या चर्चा कुठून सुरु आल्या. पण सध्यातरी अशी काही गुड न्यूज आमच्याकडे नाहीये.

मीरा बॉलिवूड डेब्यू करणारा असाही प्रश्न अनेक दिवसांपासून चालू होता. तर त्यावर ‘नो’ असे उत्तर तिने दिले आहे. एका चाहत्याने तर तिला प्रश्न केला की, मूल कि शाहिद, यापैकी कोण अधिक त्रास देतात? या प्रश्नावर उत्तर देणे मीराने टाळले .

यावर तिने एक स्माईली पोस्ट केली आहे. मिरा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे दिसून येते. बॉलिवूड मध्ये नसूनही ती शाहिदपेक्षा जास्त चर्चेत असल्याचे दिसून आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!