भाजपकडून निवडणूक लढवणार नाही – माजी आमदार शंकरराव गडाख

Ahmednagarlive24
Published:

नेवासा : मी कोणत्या पक्षातून उमेदवारी करणार या चिंतेने पछाडलेल्या आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनाच भाजपची उमेदवारी लखलाभ होवो. मी कधीही भाजपकडून उमेदवारी करणार नाही, असे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले.

वडाळा बहिरोबा ग्रामपंचायत व जि. प. सदस्य सुनील गडाख यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांच्या लोकार्पणप्रसंगी गडाख रविवारी बोलत होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते जबाजी फाटके होते. यावेळी पं. स. सभापती कल्पना पंडित, तुकाराम शेंडे, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, बाजार समितीचे सभापती कडूबाळ कर्डिले, लक्ष्मण फाटके, संजय आहेर, एकनाथ रौदळ, विश्वासराव गडाख,

सूर्यभान आघाव, कारभारी जावळे, अनिल अडसुरे, बाबुराव चौधरी, अजित रासने, बाळासाहेब नवले, भाऊसाहेब जाधव, पंढरीनाथ गायकवाड, सरपंच मीनल मोटे आदी उपस्थित होते.

गडाख यांनी आमदार मुरकुटे यांच्या कार्यशैलीवर घणाघाती हल्ला चढवत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणशिंगच फुंकले. ते म्हणाले, विकासकामे एकीकडे, तर राजकारण करणारे दुसरीकडे अशी तालुक्याची अवस्था आहे.

नाटकीपणा करण्याचे तंत्र आपल्याला जमले नाही. मागच्या निवडणुकीतील पराभवाचे मी आत्मपरीक्षण केले. तुम्हीही करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment