निलेश लंके महाराष्ट्रात एक नवीन इतिहास तयार करतील… शरद पवारांकडून आ.लंकेंचे कौतुक !

पारनेर – के.के. रेंज प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी तब्बल पाचशे पारनेरकरांना दिल्लीत नेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहा जनपथ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून साकडे घातले. केंद्र सरकारला यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू असे आश्‍वासन यावेळी पवार यांनी दिले.

पारनेर नगर तालुक्‍यातील पाण्याचा प्रश्‍न गंभीर असून येत्या काही दिवसात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पिंपळगाव जोगा, मुळा धरणासह इतर कुठल्या धरणावरून पाणी आणता येईल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

पारनेर नगर तालुक्‍याच्या पाणी प्रश्नावर चर्चा करणार असून पारनेर नगर व राहुरी तालुक्‍यातील किमान 23 गावावर आलेले के.के.रेंजचे संकट दूर करण्यासाठी व सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडणार असेही पवार म्हणाले.

दिल्लीसारख्या ठिकाणी साडेचारशे ते पाचशे लोक घेऊन फिरणारा आमदार यापुढील काळात महाराष्ट्रात एक नवीन इतिहास तयार करेल असे गौरवोद्गार पवार यांनी केले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी देशाच्या संसदेमध्ये कांदा प्रश्न संदर्भात चर्चा केली व संसदेत अधिवेशनामध्ये आ. लंके यांनी कांदाप्रश्ना संदर्भात निर्माण केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की आज हा कांदा प्रश्न नक्कीच चर्चेत आणणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment