अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : अहमदनगर शहरातील बलात्कार प्रकरणामुळे जिल्हा हादरला. कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली.
धक्कादायक म्हणजे ही पीडिता ताच्या तावडीतून सुटून रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत फिरत होती. त्या नराधमाने तिच्याशी अंधारात असे कृत्य केले
तर दिवसाच्या उजेडात बघ्यांनी तिच्या विवस्त्र शरीराचे फोटो आणि शुटिंग घेत रस्त्यावर बेईज्जत केले. या घटनेतून लोकांच्या सामाजिक जाणीवा किती बोथट झाल्यात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
या विवस्त्र तरुणीच्या अंगावर कपडे टाकावेत, तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे, पोलिसांशी संपर्क करावा, असे फोटो आणि शुटिंग घेणाऱ्यांपैकी कुणालाच वाटले नाही.
सकाळी नऊ वाजता डॉ. मुकुंद शिंदे व सामाजिक कार्यकर्ते सुरेश खामकर यांच्या निदर्शनास ही तरुणी आली. शिंदे व खामकर यांनी तत्काळ माउली सेवा प्रतिष्ठानचे संचालक डॉ. राजेंद्र धामणे यांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर तिच्यावर उपचार सुरु झाले व ती सुरक्षित झाली. ही घटना मन सुन्न करणारी आहे. एकीकडे त्या नराधमाने केलेला अत्याचार मन पिळवटून टाकणारा तर बघ्यांनी तिचे फोटो आणि शूटिंग काढून केलेला प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा