शेवगावात वीज कोसळल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

Published on -

शेवगाव :- तालुक्यातील खामगाव येथील शुभांगी राजू शिंदे (वय – 14 ) या शालेय विद्यार्थिनीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला.

रविवारी दि.21 रोजी दुपारी 2:45 च्या सुमारास घडली. रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे शुभांगी आई व बहिणीसोबत शेतात कपाशी खुरपणी करत होती.

मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने पावसामुळे मायलेकी घराकडे आडोशाला जात असताना वीज कडाडून शुभांगीच्या अंगावर कोसळली यामध्ये तिचा मृत्यू झाला.

शुभांगी शेवगाव येथील आबासाहेब काकडे विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होती.

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना घटनेची माहिती कळताच घटनास्थळी भेट देऊन कार्यकर्तेसह मदत केली.

सदर मुलीचा मृतदेह 108 रुग्णवाहिकेतून शेवगाव येथील शासकीय आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली.

रात्री उशिरा शुभांगी च्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe