शिर्डी :- शहरात विठ्ठल वाडी परिसरात राहणाऱ्या महेंद्र चिथा देवरे (वय २५) या विवाहित तरूणाने राहत्या घरात छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सदर तरुणांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेले होते. देवरे हा हाताळे (ता. मालेगाव) येथील होता. रोजगाराच्या शोधात तो शिर्डीत आला होता. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
