क्रिकेट खेळत असताना मित्रानेच केला मित्रावर कोयत्याने वार

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी : बुधवारी (दि. १२) सायंकाळच्या सुमारास क्रिकेट खेळत असताना मित्रानेच मित्रावर कोयत्याने वार करण्याची घटना घडली आहे.

सलग दुस-या दिवशी शहरात भरदिवसा थरारक घटना घडू लागल्याने शिर्डीत खळबळ माजली आहे. साईदीप कु-हाडे (वय १८, रा. वराह गल्ली, शिर्डी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

त्यास येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक मिथुन घुगे यांनी सांगितले की, काल बुधवारी (दि. १२) सायंकाळी सुजित गोंदकर यांचे मैदानात साईदीप कु -हाडे हा तरुण

आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना त्याची सुभाष राजू घोडे या मित्रा बरोबर किरकोळ बाचाबाची आणि शिविगाळ झाली.

यानंतर घोडे येथून निघून गेला. नंतर पुन्हा तासभरात परत आला आणि साईदीपच्या हातावर कोयत्याने वार करून पसार झाला.

जखमी साईदिपला शिर्डी साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून साईदीपच्या डाव्या हाताला इजा झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment