नापिकी मुळे वृद्ध शेतकऱ्याची नैराश्यातून आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी :- लोणीपासून चार किलोमीटर अंतरावर गोगलगाव (ता. राहाता) येथील ७४ वर्षांच्या शेतकऱ्याने नापिकी आणि यावर्षी पेरलेले मका बियाणे उगवले नाही म्हणून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली. बाबा महादू मगर असे त्याचे नाव आहे.

संगमनेर रस्त्यावर गायकर लवणात त्यांची दोन एकर जमीन आहे. १५ दिवसांपूर्वी त्यांनी हायटेक (सोना) ५१०१ कंपनीचे हायब्रिड मका बी पेरले होते. हे बी उगवले नाही, म्हणून मगर चिंतातूर झाले. या नैराश्यातून त्यांनी शनिवारी राहत्या घरी टिकटाँक हे गोचिड मारण्याचे विषारी औषध सेवन केले.

मुलांनी त्यांना प्रवरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. शवविच्छेदनानंतर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मगर यांच्यामागे पत्नी, दोन विवाहित मुले व एक विवाहित मुलगी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment