१५ वर्षापूर्वी बायको सोडून गेली, एकटाच रहाणार्या त्याने लघुशंकेच्या शुल्लक कारणावरुन केली तिघांची गळे कापून हत्या…

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी – निमगाव शिवारातील वस्तीवर शनिवारी (दि. १३) सकाळी शेजारी राहणाऱ्या एकाने शेजारच्या एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची घटना घडली असून कोयत्याने सपासप चार करुन एकाच आरोपीने हे खून केले.

घराजवळ लघुशंका करणे, कचरा टाकणे आदी कारणातून शेजारी राहणा-यानेच हे हत्याकांड केले असून त्याच्या हल्ल्यात दोघे जण बचावले आहेत. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान जखमी दोघांवर उपचार सुरु आहेत. या घटनेने संपूर्ण  शिर्डीसह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणा-या ठाकुर कुटुंबियांची हत्या करण्यात आली आहे.

हा प्रकार शेजारीच राहणा-या अर्जुन पन्हाळे याने केला आहे. सकाळी सहा ते साडेसहा वाजता ही घटना घडली आहे.

अर्जुन पन्हाळे याने नामदेव ठाकूर वय ६५, दगुथाई ठाकूर ५५, या तिघांचे कोयत्याने गळे कापले. यावेळी त्यांची १६ वर्षाची मुलगी कु. खुशी ठाकुर शाळेत जाण्यासाठी आवराआवर करत होती. त्याने तिचीही कोयत्याने हत्या केली.

अर्जुन पन्हाळे याने केलेल्या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर व याच कुटुंबातील आणखी एक १८ वर्षांची मुलगी ताऊ ठाकूर जखमी झाली असून या कुटुंबातील एक ६ वर्षांची मुलगी कु. महिमा ठाकूर बचावली असून जखमी दोघांवर साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून तेथे सर्वत्र रक्ताचा सडा आढळून येत आहे. पोलिसांनी शेजारच्या घरात राहणा-या अर्जुन पन्हाळे याला ताब्यात घेतले आहे.

केवळ किरकोळ वादातून त्याने हे हत्याकांड केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारची माहिती मिळताच सर्वत्र खळबळ उडाली असून लोकांची या वस्तीवर गर्दी झाली होती.

आरोपी अर्जुन पन्हाळे हा अकोल्याचा असून तो शिडींत पल्बींग, वायरिंग व रंग असे अनेक प्रकारची कामे करायचा तर ठाकुर कुटुंब हे शिडीत रोजंदारीचे कामे करायची.

दोन्ही कुटुंब शिर्डीत कामानिमित्त आले होते. ठाकूर कुटुंब गेल्या ४ – ५ वर्षापासून शिडीजवळील निमगाव शिवारात विजयनगरमध्ये विजय बाळासाहेब कातोरे यांच्या चाळीत भाडोत्री खोलीत रहात होते.

तर आरोपी अर्जुन पन्हाळे हा यांच्याच शेजारच्या खोलीत १२ वर्षांपासून एकटाच रहात होता. त्याने कचरा टाकणे, लघुशंका करणे या किरकोळ कारणातून ठाकूर कुटुंबातील तिघांची हत्या करुन दोघांवर प्राणघातक हल्ला केला.

याप्रकरणी शिडी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

घटनास्थळी सांडलेले रक्त व रक्ताने माखलेले मृतदेह पाहून पोलीस अधिकारी तसेच पाहणारे नागरिकही थक्क होवून गेले. इतके हृदयद्रावक घटनास्थळी दृश्य होते.

दरम्यान नराधम आरोपी अर्जुन पन्हाळे याला पोलिसांनी अटक केली. त्याचे पूर्ण कपडे रक्ताने भरलेले होते . त्याच्या चेह-यावर रागिटपणा दिसत होता.

१५ वर्षापूर्वी बायको सोडून गेली….
शिर्डीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील हत्यारा अर्जुन पन्हाळे याच्या मनमानी हेकेखोर स्वभावाला कंटाळून त्याची बायको त्याला १५ वर्षापूर्वीच सोडून गेलेली आहे. सध्या तो एकटाच रहातो.

त्याचे इतर कोणाशी फारसे वाद – विवाद नसले तरी तो एकलकाँडा स्वभावाचा असल्याचे डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

घरासमोर असणा -या मोकळ्या जागेत कचरा टाकला जायचा. शिवाय रात्रीच्यावेळी लांब कुठे जाण्यापेक्षा या मोकळ्या जागेत ठाकुर कुटुंबातील लोक लघुशंका करायचे.

त्याचाच राग धरुन आज पहाटे अर्जुन पन्हाळे याने कोयत्याने हल्ला चढवत या कुटुंबातील आजी, आजोबा आणि एक नात यांचा जीव घेतला

तर एक लहान नात आणि पुतण्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे वाघचौरे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment