…असा चालायचा शिर्डीतील ‘तो’वेश्या व्यवसाय

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी :- शिर्डी येथील हॉटेल साईधाममध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या सहाजणांसह तीन महिलांवर रविवारी गुन्हा दाखल केला.यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

१० वी शिक्षण घेतलेल्या परप्रांतीय १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला या छाप्यात पकडण्यात आले होते. आरोपींकडून कसून चौकशी केली असता शिर्डीतील ५ ते ६ हॉटेलमध्ये या अल्पवयीन मुलीला गि-हाईकांकडे पाठवून वेश्या व्यवसायाचा धंदा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मंगल नावाची महिला या अल्पवयीन मुलीच्या गि-हाईकांसंबंधी व्यवहार करायची. २५०० पासून ते ८ हजारापर्यंत आंबट शौकीन गिऱ्हाईक या अल्पवयीन मुलीबरोबर शरीरसंबंध करण्यासाठी आपली वासना भागविण्यासाठी पैसे द्यायचे. १ तास ते जास्तीत जास्त २ तास ही अल्पवयीन मुलगी गिऱ्हाईक घेवून जायची व वैश्या व्यवसाय करून ती परत मंगलकडे यायची. १ महिन्यापासून मुंबईतून या अल्पवयीन मुलीला शिर्डीत आणण्यात आले.

त्यामुळे मुंबईतील ‘दलालाचा’ कसून शोध सुरू असून तो सापडल्यानंतरसदर मुलगी मुंबईत कधी आली? व तिच्यावर कोठे कोठे अत्याचार करण्यात आले याचीही माहिती पुढे येणार आहे.दरम्यान अल्पवयीन मुलीबरोबर व महिलांबरोबर कोणी कोणी तोंड काळे केले, त्यांची ओळख ठिकाण तपासात पुढे आल्यानंतर या आंबटशौकीनांची खरी प्रतिमा समाजासमोर येणार आहे.

शिर्डी तील किती हॉटेलात या मुलीला नेण्यात आले? शिर्डीत मोठी चर्चा आहे. या प्रश्नावर बोलताना डिवायएसपी वाघचोरे म्हणालेकी, ५ ते ६ हॉटेलात या अल्पवयीन मुलीला नेवून देहव्यापार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तपासानंतर हॉटेलसंबंधी माहिती दिली जाईल, असे डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

या प्रकरणात पकडलेले आरोपी गणेश सिताराम कानडे, वय ३५ रा. श्रीरामनगर, शिर्डी, सुनील शिवाजी दुशिंग, वय २६, रा. विठ्ठलवाडी, शिर्डी, सागर बाबुराव जाधव , वय ३२, रा. पाटोदा, ता. येवला, हॉटेल मॅनेजर तथा हॉटेल चालक विष्णू अर्जुन ठोंबरे, वय २२, रा. भायेगाव, ता. वैजापूर, सचिन रामभाऊ शेळके, रा. कोकमठाण, ता. कोपरगाव अक्षय भाऊसाहेब बगळे, रा. लक्ष्मीनगर, कोपरगाव, गोपीनाथ रावसाहेब हिंगे, रा. पिंपळवाडी यांच्यासह मंगल, रा. राहाता, किरण, रा. शिर्डी, अनुराधा, रा. शिर्डी यांना ८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली असून डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गंभीर प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment