अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या भोजनालयातील आचारी दिलीप बाबासाहेब सांबारे( वय ४५, रा कनकुरी रोड,शिर्डी)यांचा बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावातील निळवंडे शिवारात दिलीप सांबारे यांचा मृतदेह बाभळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला शुक्रवार दिनांक ९जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घटना उघडकीस आली.
फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेहाची माहिती मिळताच पोलीस पाटील अशोक कोल्हे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू आहेर यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह झाडावरून खाली घेतल्यानंतर संगमनेर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
पुढील तपासव संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मयत दिलीप सांबारे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम