शिर्डी – कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी सौ. कविता सागर गांगुर्डे, वय २५ वर्ष ह्या तरुणीने विषारी औषध पिवून आत्महत्या केली.
सासरच्या लोकांनी चारित्र्यावर संशय घेवून तिला वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ करायचे, कविता हिने माहेरुन मोटारसायकलचे हप्ते फेडण्यासाठी पैसे आणावेत म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी करत त्रास दिला होता. या सासरच्या त्रासास कंटाळून कविता हिने विषारी औषध पिवून आत्महत्या केली.

काल याप्रकरणी मयत तरुणीची आई सविता बाळू बर्डे, रा. पिंपळदरी, ता. अकोले, जि. नगर यांनी कोपरगाव तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा सागर शिवाजी गांगुर्डे, सासरा शिवाजी गांगुर्डे, सासू लता शिवाजी गांगुर्ड, गौतम सीताराम घोडेवार, रा. कोळपेवाडी, प्रियंका शिवाजी साळंके, रा. पिंपळदरी, ता. कोपरगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.