शिर्डी :- शहरातील एका 60 वर्षीय महिलेस कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने सदर संशयित महिलेला तपासणीसाठी प्रशासनाने तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलेय.
असून लक्ष्मीनगरमध्ये रहिवाशांनी अंतर्गत गल्ली स्वयंस्फूर्तीने सील केल्या आहेत. दरम्यान, घटनेनंतर तातडीने याठिकाणी औषध फवारणी करण्यात आली असून परिसर स्वच्छ केला आहे.
दरम्यान, शिर्डी शहरातील नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या परिसरातील 60 वर्षीय महिला एक महिन्यापूर्वी कोल्हार येथे गेली होती. सदरील महिला दोन दिवसांपूर्वी शिर्डीत आपल्या घरी परतली
त्यानंतर तिला खोकला, ताप, सर्दी असल्याने तिने सावळीविहीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले तसेच शनिवारी साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालयात उपचार घेतले आहेत.
मात्र तिला कोरोना सदृश लक्षणे आढळून आले असून सदर महिलेस 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी रवाना केले आहे.
शिर्डीत तालुक्यातील पन्नास पेक्षा जास्त व्यक्तींना अगोदरच चौदा दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.त्यामुळे शिर्डीकरांची धकधक वाढली
शहरातील गजबजलेल्या वसाहतीत एका महिलेला संशयास्पद लक्षणे आढळून आल्याने या महिलेचा अहवाल काय येतो याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागून आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®