अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- टेलिकॉम कंपन्या ज्या प्लॅन आणि डेटासाठी 500 रुपयांपर्यंत आकारत होत्या त्या कंपन्यांनी रिलायन्स जिओ आल्यावर अगदी दीडशे रुपयांना अनलिमिटेड टॉकटाईम आणि अनलिमिटेड किंवा दिवसाला काही जीबी डेटा देण्यास सुरुवात केली होती.
त्या कंपन्यांची जिओच्या आगमनामुळे त्रेधा उडाली आणि त्यांना नाईलाजस्तव जिओ प्रमाणेच कमी किंमतीचे रिचार्ज स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी लाँच करावे लागले.
मात्र, डिसेंबर 2019 मध्ये परवडत नसल्याचे सांगत टेरिफ वाढविले होते. त्या कंपन्या आता पुन्हा रिचार्जचे प्लॅन वाढविणाच्या तयारीत आहेत.
कोरोनाच्या ओढावलेल्या संकटामुळे देशात लॉकडाऊन लागू असून सध्या बहुतांश नागरिक वर्क फ्रॉम होमलाच प्राधान्य देत असल्यामुळे मोबाईल व हॉटस्पॉट इंटरनेटचा, कॉलिंगचा वापर कमालीचा वाढला आहे.
परंतु या लॉकडाउनचा आर्थिक फटका एअरटेल, व्होडाफेन, आयडिया या टेलिकॉम कंपन्यांनाही चांगलाच बसलाय. त्यामुळे आता या कंपन्यांनी नुकसान भरून काढण्यासाठी त्यांचे प्लॅन पुढील महिन्यापासून महाग करण्याची शक्यता आहे.
सीएनबीसीच्या एका वृत्तानुसार एअरटेल आणि व्होडाफोनचे प्लॅन सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये 2 ते 5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
तर प्रत्येक सहा महिन्यांसाठीच्या प्लॅनमध्ये 10 टक्क्यांची वाढ होऊ शकते. परंतु यावर टेलिकॉम कंपन्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved