अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : नगर तालुक्यातील खातगाव येथे वीज पडून संतोष पवार यांच्या चाळीस मेंढयाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजता निमगाव घाणा रोडला घडली.
संतोष पवार नेहमीप्रमाणे निमगाव घाणा रस्त्यावर मेंढया चारण्यासाठी गेले होते. या परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण पसरले होते.
दुपारी दोनच्या सुमारास ढग दाटून आले होते. तेवढयाच वेळात जोरात विजेचा कडकडाट झाला.व पवार यांच्या शेळया व मेंढ्याच्या अंगावर जोरावर वीज पडली. यामध्ये ४० मेंढया जागीच ठार झाल्या.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
विजांच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह पाऊस होईल,असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.या घटनेत पवार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews