धक्कादायक: मतदान न केल्याने चक्क डोक्यात घातला दगड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न केल्याने तु आमच्या जागेत लावलेली टपरी काढून टाक अन्यथा तुला जीवे मारू अशी धमकी देत. डोक्यात दगड घालून काठीने जबर मारहाण केल्याने चौघेजण जखमी झालेत ही घटना पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथे घडली.

याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तु आम्हाला मतदान केले नाहीस त्यामुळे आमच्या जागेत लावलेली टपरी काढून घे, अन्यथा तूला जीवे मारून टाकू अशी धमकी देली. याबाबत विचारणा करण्यासाठी निलेश तात्याबा दिवटे (वय ३० सुपा टोल नाका सुपरवायझर), अुकंश गाडगे, विशाल गाडगे, विकास गाडगे (सर्वजन रा.बाबुर्डी ता. पारनेर) हे चौघेजण गेले असता.

आबासाहेब सोनबा गाडगे, सुभाष सोनबा गाडगे, छबन सोनबा गाडगे, संतोष दादाभाऊ गाडगे (सर्वजण रा.बाबुर्डी ता.पारनेर) यांनी त्यांना जबर मारहाण केली. यात सुभाष याने विशालच्या डोक्यात दगड घालून इतरांना काठीने व दगडाने जबर मारहाण केली आहे.

याप्रकरणी यांच्याविरूध्द निलेश तात्याबा दिवटे यांनी फिर्याद दिली असून त्यावरून सुपा पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोसई कोसे हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe