धक्कादायक : आरोपीकडून चमचाने पोट फाडून कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 : राहुरी पोलिस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणपत भाऊसाहेब तुपे( वय ७५ वर्षे राहणार वांबोरी.) या आरोपीने जामीन होत नसल्याने चमचाने स्वतःचे पोट फाडून कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.सदर घटना ही १६ जून रोजी घडली आहे. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

खुनाचा प्रयत्न गुन्ह्यामध्ये  गणपत भाऊराव तुपे( वय ७५ वर्षे राहणार वांबोरी) हा आरोपी राहुरी पोलिस ठाण्यातील कोठडी क्रमांक ३ मध्ये ८ एप्रिल २०२० पासून न्यायालयीन कोठडीत आहे.

दिनांक १६ जून रोजी पहाटे चार वाजे दरम्यान सहाय्यक फौजदार सुरेश बनसोडे, महिला पोलिस शिपाई मंजूश्री गुंजाळ, पोलिस नाईक शिवाजी खरात, सोमनाथ जायभाये आदि पोलिस कर्मचा-यांची गार्डरुमला ड्युटी लावलेली होती.

यावेळी आरोपी गणपत भाऊराव तुपे याने स्टीलच्या चमचाने स्वतःच्या पोटावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना पोलिस कर्मचा-यांना समजताच त्यांनी गणपत तुपे याला कोठडीतून बाहेर काढले आणि घटनेची माहिती वरिष्ठ अधिका-यांना कळविली.

वरीष्ठांच्या आदेशानुसार पोलिस कर्मचा-यांनी गणपत तुपे याला तातडीने राहुरी येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अहमदनगर येथील रूग्णालयात हलविण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment